राज्यभरात दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही मोठी वाढ सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केले असून शनिवार व रविवार संपूर्ण लॉकडाउन देखील घोषित करण्यात आला आहे. मात्र, आज दिवसभरात राज्यात ५७ हजार ७४ नवीन करोनाबाधित आढळले असून २२२ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
सध्या राज्यातील मृत्यू दर १.८६ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत ५५ हजार ८७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, आज रोजी राज्यात एकूण ४,३०,५०३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
Comments
Loading…