in

Maharashtra Corona: महाराष्ट्रात कोरोनाचा कहर… चोवीस तासांत ६३ हजार २९४ रुग्ण, तर ३४९ मृत्यू


महाराष्ट्रात कोरोनाचा कहर कायम आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात ६३ हजार २९४ रुग्णांची भर पडली आहे. यासोबतच ३४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील लसीकरण मोहिमेतही लसींच्या तुटवड्यामुळे अडथळे निर्माण होताना दिसत आहे. राज्य शासन कठोर लॉकडाऊन लागू करण्याच्या तयारीत आहे. निर्बंध अधिक कडक करण्यात आले असूनही रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे.

आज दिवसभरात राज्यात ६३ हजार २९४ कोरोनाबाधित वाढले असून, ३४९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.७ टक्के एवढा आहे. आजपर्यंत राज्यात ५७ हजार ९८७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, राज्यात आज रोजी एकूण ५,६५,५८७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान आज ३४ हजार ००८ रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २७,८२,१६१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८१.६५ टक्के एवढे झाले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Task Force Meeting: आजच्या बैठकीत ‘या’ तीन निर्णयांवर सखोल चर्चा – आरोग्यमंत्री

शरद पवारांवर आज ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया