in

महाराष्ट्राच्या हास्यजत्रेचा चौकार; आठवड्यातून चार दिवस निखळ मनोरंजन

संपुर्ण महाराष्ट्राला खळखळवून हसवणारी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आता आठवड्यातून चार दिवस असणार आहे. २० सप्टेंबर पासून हे हसण्याचं वारं प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणार आहे.

हास्यजत्रा पाहून आनंद आणि मनोरंजन मिळाल्याच्या कित्येक प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून मिळाल्या. रविवारची हास्यजत्रा झाल्यावर प्रेक्षकांनी चार दिवस हास्यजत्राची मागणी केली होती. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव आता विनोदवीर आठवड्यातून चार दिवस यायला सज्ज झाले आहेत.२० सप्टेंबरपासून आता हसण्याचे वार सोमवार ते गुरुवार असे चार दिवस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

यानिमित्ताने एक धमाल रॅप सॉंग रोहित राऊत यांनी गायलं असून आता चार वार हास्यजत्रेचा चौकार असं म्हणतं सगळे कलाकार बिनधास्त डान्स करताना दिसत आहेत. प्रेक्षकांना देखील हे गाणं आवडलं असून लाडकी हास्यजत्रा चार दिवस येणार असल्याचा आनंद त्यांना झाल्याचं दिसत आहे.

समीर-विशाखा, प्रसाद-नम्रता, गौरव-वनिता आणि हास्यजत्रेतल्या इतर हास्यवीरांनी मिळून प्रेक्षकांना आपल्या विनोदांनी आणि प्रहसनांनी नवी उमेद दिली आहे. प्रसाद-नम्रता यांची जोडी नेहमीच सरस ठरते, गौरव आणि ओंकार यांचे विनोद प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडतात.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

गणपतीत सुरू असलेल्या जुगारावर छापा; 83 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुलींना लाईन द्यायला सांगा; तरूणाचे थेट आमदारांनाच पत्र