in ,

Maharashtra Lockdown : मुख्यमंत्र्यांची ‘टास्क फोर्स’सोबत बैठक सुरू; लॉकडाऊनची शक्यता बळावली

कोरोनाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. यानंतर राज्यात मिनी लॉकडाऊनला सुरुवात झाली. सध्याची परिस्थिती पाहता राज्य लॉकडाऊनच्या दिशेने चालले आहे. यातच काल मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक पार पडली. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक कठोर निर्बंध लादण्यात आले असून वीकेंड लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. आज संध्याकाळी ५ वाजता मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्ससोबत बैठक बोलावली आहे. यानंतर राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यातच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू केला जाण्याच्या अंदाज वर्तवण्यात येत आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री टास्क फोर्ससोबत बैठक घेण्यात येणार असून त्यानंतरच याबद्दलचा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे काही दिवसांसाठी लॉकडाऊन लागू केला जाण्याची शक्यता आहे.

What do you think?

-2 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

NIA : रियाझ काझीला १६ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी

जगभरात लॉकडाउनशिवाय पर्याय नाही – अस्लम शेख