in

Maharashtra Lockdown Extended | राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला, पाहा नियमावली

राज्यात सुरू असलेला लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. राज्य सरकारने यासंदर्भात आदेश काढला असून त्यानुसार आत्ता राज्यात लागू असलेले निर्बंध १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत.

लॉकडाउन वाढवण्यात आला असला, तरी त्यादरम्यान याआधीच १३ एप्रिल आणि २१ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आलेले निर्बंध लागू असतील, असं देखील राज्य सरकारकडून या आदेशांमध्ये जाहीर करण्यात आलं आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बोलताना १५ दिवस किंवा त्याहून जास्त काळासाठी लॉकडाउन वाढवला जाऊ शकतो, अशी शक्यता त्यांनी वर्तवली होती. त्यानुसार आज राज्य सरकारने स्वतंत्र आदेश काढून राज्यात लॉकडाऊन जाहीर केले.

नियमावलीत काय ?

 • 1 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून राज्यात कडक लॉकडाऊन
 • 15 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन
 • सामान्यांना मुंबई लोकल प्रवास पूर्ण बंद
 • सामान्यांसाठी मेट्रो, मोनो प्रवास बंद
 • राज्यात जिल्हा बंदी लागू
 • अत्यावश्यक कारणाशिवाय आंतरजिल्हा प्रवास बंद
 • सर्वसामान्यांच्या विनाकारण प्रवासावर बंदी
 • खासगी वाहतुकीला केवळ अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी
 • सार्वजनिक वाहतूक 50% क्षमतेनं चालणार
 • एसटी बस वाहतूक 50% क्षमतेनं सुरू राहणार
 • अंत्यविधी, आजारपणासाठी प्रवासाची मुभा
 • खासगी वाहतूकदारांनी नियम मोडल्यास 10 हजार दंड
 • सरकारी कार्यालयांमध्ये 15% उपस्थिती
 • अत्यावश्यक सेवेतील सर्व कार्यालयं 15% हजेरीनं चालणार
 • लग्न समारंभासाठी 25 जणांना फक्त 2 तासांसाठी परवानगी
 • लग्नाचे नियम मोडल्यास 50 हजार दंड भरावा लागणार
 • बाहेरून येणाऱ्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन करणार
 • होम क्वॉरंटाईन नागरिकांच्या हातावर शिक्का बंधनकारक
 • कोरोना संक्रमीत रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात पाठवणार
 • फक्त अत्यावश्यक कारणासाठीच घराबाहेर पडता येणार

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Pune Lockdown Extended | पुण्यात 15 मेपर्यंत लॉकडाऊन कायम

Rajesh Tope | राज्यात 15 मेपर्यत कडक लॉकडाऊन, जनतेने सहकार्य करावे- राजेश टोपे