in ,

Maharashtra Lockdown | गर्दी झाल्यास बाजारपेठा आणि अत्यावश्यक सेवाही होणार बंद!

शहरातील करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. मात्र, बाजार समितीसह इतर ठिकाणी होणाऱ्या गर्दीत घट झाल्याचे दिसत नाही. राज्यात लॉकडाऊन लागू करुनही बाजारपेठांमध्ये होणाऱ्या तुफान गर्दीमुळे आता राज्य सरकार अत्यावश्यक सेवाही बंदी करण्याच्या विचारात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी-पोलीस प्रशासनाला तसे निर्देश दिले आहेत. त्यामुळे बाजारपेठांमधील गर्दी कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत अत्यावश्यक सेवांवरही निर्बंध येण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, असे आदेश दिले आहेत. अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा. जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत. मात्र याचा अर्थ तिथे नियम मोडले जात आहेत किंवा गर्दी होत आहे असे दृश्य दिसता कामा नये. अन्यथा, त्या सुविधा स्थानिक प्रशासनाने बंद कराव्यात, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

मुंबई, पुणे आणि नागपुरातील बाजारपेठांमध्ये आजही गर्दीच

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आवश्यक आहे, हे वारंवार सांगूनही लोक सकाळच्या वेळेत बाजारपेठांमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. मुंबई, पुणे, नागपूर अशा सर्वच शहरांमध्ये हे चित्र दिसत आहे. मुंबईच्या दादर परिसरात आज सकाळीही नागरिकांनी भाजीपाल्याच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती. त्यानंतर पोलिसांनी बाजार बंद करण्याचे आवाहन केले. तर पुणे यार्डातील बाजारपेठेतही खच्चून गर्दी झालेली पाहायला मिळाली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सोने व्यापारात जून 2021 पासून होणार महत्त्वाचे बदल

खाकी वर्दीला कोरोनाचा विळखा; परभणीत 112 पोलिसांना कोरोनाची लागण