in

दिल्लीतल्या कारवाईनंतर महाराष्ट्र ‘अलर्ट मोड’वर; गृहमंत्र्यांनी बोलावली बैठक

दिल्ली स्पेशल सेलनं काल केलेल्या कारवाईत सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. येत्या दिवसात देशभरात त्यांचा हल्ले करण्याचा कट होता. याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

पोलीस आयुक्त, एटीएस चीफ यांच्यासोबत ही बैठक होणार आहे. राज्यातील कायदा, सुव्यवस्थेचा आढावा बैठकीत घेतला जाणार आहे. दिल्लीतील पोलिसांच्या कारवाईनंतर महाराष्ट्र गृह विभाग अलर्ट मोडवर आला आहे. या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्र एटीएस चीफ विनीत अग्रवाल त्याचप्रमाणे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि अन्य उच्च गृह विभागातील पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या ६ दहशतवाद्यांपैकी एक मुंबईतील मोहम्मद शेख साहेब परिसरात राहणारा आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि दहशतवादाविरोधात होणाऱ्या उपाययोजनांचा आढावा या बैठकीत घेतला जाईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक; ओबीसी आरक्षणावर चर्चेची शक्यता

स्पुटनिक लाइटचा मार्ग मोकळा होणार?