in

Maharashtra Corona | महाराष्ट्रात ७ हजार ७५६ रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात आज कोरोना बाधित रुग्णांची संख्या आणि बरे झालेली संख्या जवळपास एकसारखीच आढळून आली आहे. आज ७ हजार ७५६ रुग्ण कोरोनामुक्त झाली आहेत, तर ७ हजार ३०२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या खाली आली असून ती ९४ हजार १६८ इतकी झाली आहे. राज्यात एकूण ७ हजार ३०२ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. आजच्या १२० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्क्यांवर सरकला आहे. ७ हजार ७५६ रुग्ण कोरोनामुक्त झाली असून याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६० लाख १६ हजार ५०६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३४ टक्के एवढे झाले आहे.

देशात ४१ हजार ३८३ नवे रुग्ण

केंद्रीय आरोग्यमंत्रालाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासात ४१ हजार ३८३ नवे रुग्ण आढळले. तर ३८ हजार ६५२ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच ५०७ रुग्णांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या देशात ४ लाख ०९ हजार ३९४ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.आतापर्यंत देशात ३ कोटी १२ लाख ५७ हजार ७२० करोना रुग्ण आढळले आहेत. यापैकी ३ कोटी ०४ लाख २९ हजार ३३९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत ४ लाख १८ हजार ९८७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बहुचर्चित असुर २ शुटींग सुरु…

तळकोकणात ऑरेंज अलर्ट; अनावश्यक घराबाहेर पडू नये – जिल्हाधिकारी