in

Maharashtra Lockdown: ”राज्यात लवकरच संपूर्ण लॉककडाऊन”

राज्यात कोणत्याहीक्षणी लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता आहे. या संदर्भात अध्यादेश राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे लवकरच जाहीर करतील. अथवा लॉकडाऊनचा निर्णय उद्या होण्याचीही शक्यता आहे.

राज्यात संचारबंदी लागू असली तरी कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे हा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी मंगळवारी मंत्री मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व नेत्यांचे राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यासंदर्भात एकमत झाले. बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लागू होण्याचे संकेत दिले. त्यामुळे मुख्यमंत्री बुधवारी लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करतील अशी माहिती दिली होती.

दरम्यान आज नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेमुळे मुख्यमंत्री आज लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करतील याची शक्यता कमीच आहे. तरीही राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे लॉकडाऊन संदर्भातला अध्यादेश काढण्याची शक्यता आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अनिल अंबानींची ‘ही’ कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; ३८ बँकांचा जीव टांगणीला

CSK vs KKR : चेन्नईचा कोलकातासमोर 220 धावांचा डोंगर