in , ,

बापरे! देशात रुग्णवाढीत महाराष्ट्र अव्वल

New Delhi, Sep 08 (ANI): Rajesh Bhushan, Secretary, Union Health Ministry addresses during a press conference, in New Delhi on Tuesday. (ANI Photo)

देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. यामध्ये सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या राज्यात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागासह आता केंद्रीय आरोग्य विभागाने सुद्धा यावर चिंता व्यक्त केली आहे.

कोरोना रुग्णसंख्या वाढीत देशात दोन राज्यांमधील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. महाराष्ट्र आणि पंजाब या राज्याचा यामध्ये नंबर लागतो आहे. या दोन जिल्ह्यातील रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 28 हजार रुग्णांची नोंद झाली असून पंजाबमध्येही लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णसंख्या जास्त आहे.” असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी यावेळी सांगितलं.

या दोन राज्यांनंतर गुजरात, मध्य प्रदेशमधली कोरोनास्थिती चिंताजनक आहे. गुजरातमध्ये दिवसाला १७०० तर मध्य प्रदेशात १५०० रुग्ण सापडत आहेत. गुजरातमध्ये सर्वाधिक रुग्ण सूरत, अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि भावनगरमध्ये आहेत. मध्य प्रदेशात भोपाळ, इंदोर, जबलपूर, उज्जैन आणि बेतूलमध्ये जास्त रुग्ण आहेत,” अशी माहिती आरोग्य सचिवांनी दिली.

राज्याच्या ‘या’ 10 जिह्यात सर्वाधिक रुग्ण

कोरोना रुग्णवाढीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. यामध्ये पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव आणि अकोलाचा समावेश आहे.आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शिवसेनेच्या नाकावर टिचून जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा; संजना सांवत अध्यक्षपदी

नाशिकमध्ये वीज तोडणीने संतप्त शेतकऱ्यांनी कोंडले भाजपा आमदाराला