in

‘माझा गणोबा’ हे अनोखं गाणे गणेशभक्तांच्या भेटीस

यंदाचा गणेशोत्सव कोरोनाचं सावट असतानाही तितक्याच उत्साहात बाप्पाच्या आशीर्वादाने साजरा होणार आहे. याच उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी श्रिया क्रिएशन निर्मित ‘माझा गणोबा’ हे गणपती बाप्पाला वाहिलेलं अनोखं गाणे गणेशभक्तांच्या भेटीला आले आहे.

ख्यातनाम पार्श्वगायक नंदेश विठ्ठल उमप यांनी हे गाणं गायलं आहे. तर गीतकार वर्षा राजेंद्र हुंजे यांनी हे गाणं लिहिलंय. वर्षा राजेंद्र हुंजे ह्या गेल्या काही वर्षांपासून गीत, गझल लेखन करतात. यापूर्वीही वर्षा हुंजे यांनी अनेक कविता, गझल लिहिल्या आहेत. त्या सोशल मीडियावर लोकप्रिय ठरल्या. जगावर कोरोनाचं संकट अजूनही घोंघावत आहे. त्याच अनुषंगाने वर्षा हुंजे यांनी बाप्पाला ‘माझा गणोबा’ या गाण्यातून साकडं घातलं आहे.

तुझा पहिला मान
देवा उघड कान
हाक भक्ताची जाण
द्यावे सुखाचे दान

या गाण्यातून बाप्पाकडे सुखाचे दान मागण्यात आले आहे. गणेशोत्सवावर कुठलंही संकट आलं तरी विघ्नहर्ता बाप्पा नेहमीच अशी संकटे निवारण करत आला आहे. आताही हे कोरोनाचं संकट बाप्पा दूर करेल, त्यासाठी या गाण्यातून गणपती बाप्पाला साकडे घालण्यात आले आहे ते गाण्याच्या शेवटच्या अंतऱ्यातून….

आधी आला ओला दुष्काळ वर कोरोना कर्दनकाळ
पोराबाळांची भारी आबाळदेवा तुच आता सांभाळ..

या गाण्याबद्दल गीतकार वर्षा हुंजे म्हणाल्या, “गेल्या दीडएक वर्ष कोरोनामुळे आपण भीतीच्या सावटाखाली वावरत आहोत, अशावेळी गणेश भक्तांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी ‘माझा गणोबा’ हे गाणं म्हणजे गणपती बाप्पाकडे केलेली एक प्रार्थना आहे. ही प्रार्थना लिहिण्याची प्रेरणा मला गणपती बाप्पाकडूनच मिळाली.

संगीतकार आणि गायक नंदेश उमप म्हणाले, ” हे गाणं माझ्याकडे आलं…त्यावेळी मी प्रवासात होतो. मुखडा ऐकल्यानंतर मी म्हटलं की, घरी पोहोचतो आणि डोक्यात आलेली चाल ऐकवतो. हार्मोनियम हातात घेतली आणि काही मिनिटातच चाल तयार झाली. त्यानंतर गीतकार आणि निर्मात्यांना ही चाल ऐकवली आणि लगेच निर्णय झाला की हे गाणं करायचं… आपला बाप्पा शंभर देशात जातो, तिथे त्याची प्रतिष्ठापना होते. तसंच हे गाणं शंभर देशात तितकंच जोरदार वाजणार आहे. गणेशावरील गाण्याला मी पहिल्यांदाच संगीत दिलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“रश्मीताई, तालिबानी प्रवृत्तीच्या मुसक्या कधी आवळणार ?”

”माय-भगिनींच्या रक्षणासाठी सरकारला बळ दे”; यशोमती ठाकूरांचे महालक्ष्मीला साकडे