in

‘मोदी सरकारच्या काळात माध्यमांची मुस्कटदाबी’

गेल्या काही वर्षांत दलित आणि अल्पसंख्याकावरील अत्याचार वाढले आहेत. प्रसार माध्यमांची मुस्कटदाबी सुरू आहे. सीबीआय, ईडी, निवडणूक आयोग अशा स्वायत्त संस्थांचा दुरुपयोग वाढला आहे. सरकारविरोधात बोलले की तपास संस्थांच्या माध्यमातून चौकशी लावली जाते. सूड उगवण्याचं काम सुरू आहे. अनियंत्रित लोकशाही हुकूमशाहीला जन्म देते, हे बाबासाहेबांचे शब्द आज खर ठरत आहेत, असं राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व मुंबई विभागीय काँग्रेसच्या वतीनं व्हर्च्युअल सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खरगे बोलत होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन सभा झाली. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राज्यातील काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते.

दरम्यान, सर्वांना या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. तसंच उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यात अवकाळी पाऊस; बळीराजा संकटात

सोने व्यापारात जून 2021 पासून होणार महत्त्वाचे बदल