in

ममता बॅनर्जी झाशीच्या राणी प्रमाणे लढल्या – छगन भुजबळ

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांची सत्ता येताना दिसत आहे. ममता बॅनर्जी झाशीच्या राणी प्रमाणे लढल्या.. मै अपना बंगाल नही दुंगी अशी प्रतिज्ञा ममता यांनी केली होती. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

संपूर्ण शक्ती लावूनही आसाम वगळता भाजपला कुठेच साथ नाही. भाजप विरोधात प्रचंड लाट देशात तयार झाली आहे. या काळात देशात निवडणूक झाली तर भाजप नावालाही सापडणार नाही, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिलीय. तर पंढरपूर पोट निवडणुकीचा निकाल गट तट आणि इतर स्थानिक राजकारणामुळे लागत आहे, त्यावरून देशाचा कल बांधता येत नाही, असेही ते म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आंध्रप्रदेशमध्ये ऑक्सिजन अभावी १४ रूग्णांचा मृत्यू; जिल्हा प्रशासनाने आरोप फेटाळले

जनतेने भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले