in

पंतप्रधान मोदींवर प्रचार बंदी का नाही; ममतांचा सवाल

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. राज्यातील काही भागात कोरोनाचा प्रसार वाढण्यास भाजपा जबाबदार आहे, असं ममता यांनी म्हटलं आहे. सरकारनं सर्वांचं लसीकरण केलं असतं तर देशात कोरोनाची दुसरी लाट आली नसती असंही त्यांनी म्हटलं आहे.

बंगाल निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपानं उपऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आणलं आणि त्यामुळेच राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली, असा आरोपही ममतांनी केला आहे. इतके दिवस तुम्ही कुठं होता. कोरोना आणला आणि तुम्ही पळून गेलातत. जर त्यांनी (भाजपा) सर्व लोकांचं वेळेत लसीकरण केलं असतं तर कोरोनाचे नवे रुग्ण आढळले नसते, असंही ममतांनी म्हटलं आहे.

हिंदू, मुस्लीम आणि अन्य धर्मियांना एकत्रित मतदान करण्याचं आवाहन करणं चूक आहे का, असा सवाल त्यांनी केला. मग, प्रत्येक सभेत आपली खिल्ली उडवणाऱ्या मोदींवर बंदी का नाही, असा थेट सवाल ममता यांनी निवडणूक आयोगाला केला आहे. ममतांनी कथित वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर २४ तासांसाठी प्रचार बंदी करण्यात आली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Coronavirus | सलग दुसऱ्या दिवशी १ हजाराहून जास्त रुग्णाचा मृत्यू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत डॉक्टरांचे आज काम बंद आंदोलन