in

निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात ममतांचं धरणे आंदोलन

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी गांधी मूर्तीजवळ धरणे आंदोलन केलं. निवडणूक आयोगानं २४ तासांसाठी प्रचार करण्याची बंदी लागू केली होती. या आदेशाविरोधात ममता आंदोलन करण्यासाठी बसल्या आहेत.

जातीयवादी वक्तव्यं आणि केंद्रीय सुरक्षा दलांविरोधी वक्तव्य केल्यामुळे निवडणूक आयोगानं ममतांवर कारवाई केली होती. १२ एप्रिलला रात्री ८ वाजेपासून १३ एप्रिल रात्री ८ वाजेपर्यंत ममतांना प्रचारास बंदी करण्यात आली आहे. भाजपच्या नेत्यांनी ममता यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. ममतांनी लोकप्रतिनिधी कायदा आणि आचारसंहितेच्या तरतुदींचं उल्लंघन केल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.

विद्यापीठांसाठी कन्याश्री शिष्यवृत्ती आहे. अनुसूचित जाती आणि जमातींसाठी शिक्षाश्री आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी स्वामी विवेकानंद शिष्यवृत्ती आहे. अल्पसंख्याक समुदायातील माझ्या बंधू आणि भगिनींसाठी, एक्यश्री आहे. मी २ कोटी ३५ लाख जणांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून दिला आहे. भाजपाकडून पैसे घेतलेल्या पक्षांना मतदान करू नका. मी तुम्हाला हात जोडून विनंती करते. मतांचं विभाजन होऊ देऊ नका, असं ममता बॅनर्जी सभेत म्हणाल्या.

ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी लोकप्रतिनिधी कायद्यातील विविध कलमांचं उल्लंघन केलं आहे. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडेल आणि निवडणूक प्रक्रियेला खिळ बसू शकेल, अशी अत्यंत भडक विधानं ममता बॅनर्जी यांनी केली आहेत, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अखेर वर्ध्यात 18 हजार 360 लसीचे डोस पोहचले…

IPL 2021 MI vs KKR: सामना कधी, कुठे, केव्हा?