in

अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करणाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांचा चोप

संदीप गायकवाड | विवाहित महिलेचे अश्लिल व्हिडीओ काडून तिला ब्लॅकमेल करणाऱ्या वासनांध तरुणाला मनसे कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वसईच्या नायगाव रेल्वे स्टेशन परिसरात शुक्रवार 8 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. मनोज थोरात असे चोप दिलेल्या तरुणाचे नाव असून तो चुनाभट्टी येथील राहणारा आहे.

महिलेने मनसे पदाधिकारी प्रफुल कदम यांच्याकडे तक्रार केली होती. मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, वसई विरार शहराध्यक्ष प्रवीण भोईर, माजी नगरसेवक प्रफुल पाटील यांना माहिती देऊन, प्रफुल कदम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तरुणावर ट्रॅप लावून, नायगाव रेल्वे स्टेशन परिसरात पकडून, बेदम चोप दिला आहे. चोप देत त्याला वालीव पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे..

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दिवाळीच्या सुट्टीत पर्यटनासाठी एसटी सज्ज

मुंबईकरांच्या कराचा पैसा खड्ड्यात घातला की कॉंट्रक्टर्सच्या घशात? नितेश राणेंचं महापौरांना पत्र