in , ,

थर लागणारच… “मनसे” इशारा

कोरोनाच्या महामारीत गेल्यावर्षी अनेक सणांवर निर्बंध लावण्यात आले होते, कोरोनाची सद्य परिस्थिती पाहता तिसरया लाटेच संकट तोंडावर आहे अस असताना देखील ठाण्यात दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे , ३१ ऑगस्टला ठाण्यात मनसे कडुन विश्वविक्रमी दहीहंडीचं आयोजन करण्यात आल असून , दोन लस घेतलेल्या गोविंदा पथकांना दहीहंडी उत्सवात सामील होण्याचं मनसे नेते अभिजित पानसे आणि मनसे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांचं आवाहन आहे.

कोविड चे सर्व नियम पाळून दहीहंडी उत्सव साजरा करणार असल्याचे मनसे नेते अभिजित पानसे आणि मनसे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी स्पष्ट केले आहे,
कोरोनाच्या पार्श्वंभूमीवर गेल्यावर्षी दहीहंडी अगदी साध्या पद्धतीने करण्यात आली होती, कुठेच दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आल नव्हतं,पण आता यावर्षी तिसरया लाटेच संकट तोंडावर असताना सुद्धा मनसे विश्वविक्रमी दहीहंडी उत्सव साजरा करणार आहे, अद्याप दहीहंडी उत्सवाची नियमावली स्पष्ट झालेली नसताना हे सरकारला एक प्रकारे आव्हान केल आहे. दहीहंडी सारख्या उत्सवादरम्यान कोविड चा संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ शकतो,

३१ ऑगस्ट ला दहीहंडी साजरी करणार आहोत, त्यासाठी अनेक मंडळांना आव्हान केल आहे, कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन दहीहंडी उत्सवात सामील व्हा आणि आपला मराठी सण एकत्र येऊन आनंदाने साजरा करूया, अस अभिजीत पानसे यांनी म्हंटल आहे, दहीहंडी उत्सवाची नियमावली स्पष्ट झालेली नसताना हे सरकारला एक प्रकारे आव्हान केल्यामुळे याप्रकरणावर राजकीय नाट्य रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकार, स्थानिक प्रशासन आणि पोलीस या बाबत काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“आम्ही रावसाहेब दानवेंकडे शिकवणी लावू…”

नेटवर्कच्या शोधात विद्यार्थी डोंगरमाथ्यावर