in

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण | NIAने तपासले 800 सीसीटीव्ही फुटेज

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या तपासात राष्ट्रीय तपास संस्थाने (NIA) तब्बल 800 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. यातून निलंबित अधिकारी सचिन वाझेंविरोधात ठोस पुरावे एनआयएने गोळा केले आहेत. तसेच या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत 40हून अधिक जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. यापैकी 8 जणांना साक्षीदार केल्याचेही समजते आहे.

या तपासातून एनआयएने वाझेंविरोधात ठोस पुरावे ताब्यात घेतले आहेत.रियाजुद्दीन काझींचीही चौकशीयाशिवाय नुकतेच निलंबित करण्यात आलेले पोलीस अधिकारी रियाजुद्दीन काझी यांचीही चौकशी एनआयएकडून केली जात आहे. त्यांच्या चौकशीतून या संपूर्ण गुन्ह्यामागचा हेतू काय हे एनआयएचे अधिकारी समजून घेत आहेत. काझींच्या चौकशीतून समोर येणाऱ्या गोष्टींची पडताळणी एनआयएचे अधिकारी करत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

coronavirus | ”राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्र मृत्यूचा सापळा बनली आहे”

‘कोर्ट’ चित्रपटातील अभिनेते वीरा साथीदार यांचं कोरोनामुळे निधन