in

”मुंडे साहेब असते तर मराठा समाजाला आरक्षण मिळालं असतं”

मी 7 वर्षापुवी साहेबांना गमावलं,दोन वर्षापुर्वी मी पराभूत झाले, मात्र समाधीवर नतमस्तक होऊन समाजाला सोडणार नसल्याचा निर्धार केला, असे विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे.

भाजपचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्रात लोकनेते म्हणून ओळख असलेले गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त डाक पाकीट Postal Envelope चं अनावरण करण्यात आलं. या निमित्त गोपीनाथ गडावरुन ऑनलाईन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते ऑनलाईन माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमानिमित्त संबोधित करताना त्या बोलत होत्या.

मराठा समाजाची घोर निराशा झाली आहे. मुंडे साहेब म्हटले होते भगवान गडावरमराठा समाजाला आरक्षण देऊ. मुंडे साहेब असते तर मराठा आरक्षण मिळालं असत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात आरक्षणाच्या नावावर राजकारण सुरु आहे. त्यामुळे राज्यसरकारने किती टक्के आरक्षण मराठा समाजाला देऊ शकता हे सांगा ? आम्हाला दिवस सांगा ? किती टक्के देणार ते सांगा ? असा सवाल पंकज मुंडे यांनी केला. तसेच आरक्षणाबाबतची तुमच्या भूमिकेडे स्पष्टता सांगा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘माझा मोबाईल, माझी जबाबदारी’, महापौरांच्या ट्विटला संदीप देशपांडेंचा टोला

…तर ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत झाली नसती, फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल