in

“प्रत्येक गोष्ट केंद्राच्या माथी मारणारे हे लोक”; देवेंद्र फडणवीस यांची राज्यसरकार टीका

केंद्र सरकारने 102 व्या घटनादुरुस्तीसाठी सर्वोच न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केल्यानंतर मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी 50 टक्क्यांवरच्या आरक्षणासंदर्भात देखील केंद्राने याचिका दाखल करण्याची मागणी केली होती. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करताना राज्य सरकारला चांगलेच झापले. “सगळं केंद्रानं करायचं आणि राज्यात आम्ही माशा मारायच्या अशी टीका त्यांनी यावेळी केली.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, अशोक चव्हाणांनी कायदा समजून आणि सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका कोण करू शकतं यासंदर्भात विचार करायला हवा असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला. तसेच राज्याने ५० टक्क्यांवरचं आरक्षण दिलं होतं. त्यामुळे याविरोधात केंद्र सरकार कशी पुनर्विचार याचिका करेल?” असा सवाल देखील फडणवीस यांनी उपस्थित केला. आपली असफलता लपवण्याकरता प्रत्येक गोष्ट केंद्राच्या माथी मारणारे हे लोक, अशी टीका देखील त्यांनी यावेळेला केली.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maratha Reservation | …तरी 5 जूनला मोर्चा काढणार; विनायक मेटे आक्रमक

गुजरातमध्ये कोरोना मृतांच्या आकड्यांची लपवा-छपवी ?