in

Maratha Reservation | मराठा आरक्षणावर निर्णय झाला नाही तर एकदाच…; संभाजीराजे छत्रपती

कोल्हापुरात संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत मराठा समाजाची बैठक झाली. कोल्हापुरातील सर्व समन्वयक या बैठकीला उपस्थित होते. 16 जूनला मराठा समाजाच्या वतीनं जे आंदोलन करण्यात येणार आहे त्यावर चर्चा करण्यात आली.

येत्या 16 जून रोजी कोल्हापूर, नाशिक, अमरावती, संभाजीनगर, रायगड याठिकाणी सुरुवातीला आंदोलन होईल. 36 जिल्ह्यात आंदोलन केलं जाईल आणि मराठा आरक्षणावर निर्णय झाला नाही तर एकदाच जोर लावाण्यात येईल. त्यात पुण्यापासून मंत्रायलापर्यंत लॉंग मार्च काढला जाईल. या मोर्चासाठी सर्व आमदार, खासदार यांचा सन्मान ठेऊन बोलवू. मराठा आरक्षणाबाबत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांकडे बोट करत आहेत. आपल्याला आता कुणाच्या चुका काढायच्या नाहीत. पहिल्यांदा राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे. कलम 338 बी मधून पुन्हा मराठा समाजाला मागास असल्याचे सिद्ध केले पाहिजे अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

विदर्भात आठवडाभर मुसळधार पाऊस, पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा

नालासोपाऱ्यात पावसाने उडवली दाणादाण