in

Maratha reservation| छत्रपतींची राज्य सरकारला ताकीद , दिल्लीत होणार गोलमेज परिषद

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, शरद पवार, राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्यानंतर आता संभाजीराजे आपली मराठा आरक्षणाच्या संदर्भातील पुढील भूमिका स्पष्ट करत 6 जून शिवराज्यभिषेकदिनी , रायगडावरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर ९ ऑगस्ट रोजी दिल्लीत गोलमेज परिषद होणार आहे. अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर छत्रपती संभाजी यांनी पत्रकार परिषदेत संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण टिकवण्यासाठी पर्यायही सांगितले. ओबीसीमध्ये नवीन प्रवर्ग तयार करणं शक्य आहे का? हे पाहावं. ते मी नाही सांगणार. वंचितांना आरक्षण मिळावं या मताचा मी आहे. 6 जून शिवराज्यभिषेकदिनी मराठा समाजाची निर्णायक भूमिका किल्ले रायगडावरून जाहीर करणार असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

6 जून रोजी काय झालं शिवाजी महाराज हे छत्रपती झाले. शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक यावेळी झाला. 6 जूनपर्यंत मराठा आरक्षणाच्या संदर्भावर निर्णय घेतला नाही तर आमची आंदोलनाची भूमिका, रायगडावरून आंदोलनाची सुरूवात करणार असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे. ते स्वत: या आंदोलनात उतरणार अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. छत्रपती संभाजी यांनी 6 जून पर्यंत राज्य सरकारला अल्टिमेटम दिले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maratha Reservation | आता चेंडू महाविकास आघाडीच्या कोर्टात; संभाजीराजेंनी दिले तीन पर्याय

जाणून घ्या कलम ३४२ अ नेमकं आहे तरी काय? मराठा आरक्षणासोबत त्याचा नक्की संबध काय?