in

Maratha Reservation | 16 जूनपासून मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला सुरुवात

मराठा आरक्षणाच्या प्रकरणी आता राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आता समाज बोलणार नाही, तर आता आमदार, खासदार आणि मंत्री बोलतील असं म्हणत त्यांनी मूक आंदोलन छेडलं आहे. 16 जूनपासून कोल्हापुरातून या आंदोलनाची सुरुवात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मराठा समाजाने आतापर्यंत संयम दाखविला, आता आक्रमकता काय असते ती दाखवू, असा आक्रमक पवित्रा घेत एक इशारा त्यांनी दिला आहे. कोल्हापूर शहरातील शासकीय विश्रामगृहावर गुरुवारी सकल मराठा समाजाच्या प्रमुख समन्वयकांच्या घेतलेल्या बैठकीत खासदार संभाजीराजे बोलत होते.

खा. संभाजीराजे छत्रपती म्हणाले, 16 जून रोजी होणारं हे आंदोलन कोल्हापूरातल्या शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून सुरु होईल. राज्याच्या 36 जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले, आत्तापर्यंत समाज खूप बोलला पण आता आपण नाही बोलायचं. आता आमदार, खासदार, मंत्री बोलतील. आता मराठा समाजाच्या आरक्षणाची जबाबदारी आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी घेतली पाहिजे.
तसेच, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, रायगड या जिल्ह्यातही मूक आंदोलने होतील.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शेतकऱ्यांना पीकविमाचा लाभ मिळवून देण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

पाहा अल्लू अर्जुनच्या गाण्यावर कार्तिक आर्यनचा धमाल डान्स