in ,

अफगाणिस्तानातील मशिदीत भीषण स्फोट; 100 जणांचा मृत्यू

तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज केल्यापासून तेथे कायम अस्थिर वातावरण आहे. शुक्रवारी अफगाणिस्तानच्या उत्तरी कुंदुंज प्रांतात झालेल्या भीषण स्फोटात १०० जणांचा मृत्यू झाला आणि अनेकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तालिबान पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एएफपीने याबाबत वृत्त दिले आहे.

उत्तरी कुंदुज प्रांतामधील सय्यद अबाद मशिदीत हा स्फोट झाला आहे. स्थानिक नागरिक शुक्रवारीच्या नमाजसाठी मोठ्या संख्येने मशिदीत जमलेले असताना स्फोट झाला. अद्याप या स्फोटाची जबाबदारी कुणी स्वीकारलेली नाही. इस्लामिक स्टेट गटातील दहशतवाद्यांचा अफगाणिस्तानच्या शिया मुस्लिम अल्पसंख्यांकांवर हल्ला करण्याचा इतिहास आहे.

कुंदुज प्रांताचे पोलीस अधिकारी दोस्त मोहम्मद ओबैदा यांनी सांगितले की, स्फोटामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. आत्मघातकी हल्लेखोर हा नमाजसाठी आलेल्यांच्या गर्दीत सहभागी होऊन आला असण्याची शक्यता आहे. तसेच, मी आमच्या शिया बांधवांना आश्वासन देतो की, तालिबान त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सज्ज आहे. तपास सुरू आहे, असंही ओबैदा म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

CHIPI AIRPORT : दक्षिणेकडील राज्यांशी कनेक्टिव्हीटी वाढणार

फेसबुक, व्‍हॉटसअॅप स्‍टेटस ठेवण्‍यापेक्षा देशाचे स्‍टेटस कसे उंचावेल याकडे लक्ष द्या..