in

RR vs PBKS: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्जमध्ये आज सामना

आयपीएल 2021 चा चौथा सामना आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्जमध्ये रंगणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळविण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7.30 वाजता सुरुवात होणार असून 7 वाजता सामन्याचा टॉस होईल.

आयपीएलच्या या मोसमात पंजाब संघाची ओळख किंग्ज इलेव्हन पंजाब नसून पंजाब किंग्ज अशी असणार आहे. पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार केएल राहुल मागील मोसमात शानदार फॉर्ममध्ये होता. केएल राहुल याच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने मागील मोसमात प्लेऑफमध्ये स्थान पक्कं करण्याचा भरपूर प्रयत्न केला होता मात्र त्यांना यश आलं नव्हतं आता यावेळी पहिल्या मॅचपासून धमाकेदार प्रदर्शन करुन प्रवासाची सुरुवात मोठ्या थाटात करण्याचा पंजाबचा मानस आहे. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व उमदा खेळाडू संजू सॅमसन करणार आहे. दोन्ही संघ जिंकण्याच्या हेतूने मैदानात उतरणार आहेत.

गेल्या मोसमात राजस्थान आणि पंजाब यांच्यात दोन सामने खेळले गेले होते आणि दोन्ही सामने राजस्थानने जिंकले होते. पहिल्या सामन्यात राजस्थानने पंजाबचा चार गडी राखून पराभव केला. यात राहुल तेवतियाने शेल्डन कॉटरलच्या एका षटकात 5 षटकार ठोकले होते. दुसरा सामना राजस्थानने सात विकेट्सने जिंकला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

#BoardExams2021 : दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या…

देवभुमीत भक्तांची अफाट गर्दी… कोरोना नियमांचे तीन तेरा