in ,

‘गर्दी वाढतच राहिली तर परिस्थिती गंभीर होईल’

राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कलम १४४ सुद्धा लागू आहे. मात्र, तरिही गर्दी कमी होताना दिसत नाही. अशाचप्रकारे गर्दी होत राहिली तरी परिस्थिती गंभीर होईल, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

गर्दी करणाऱ्यांचं करायचं काय, असा उद्विग्न सवालही पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. मुंबईत बेड्स वाढवत आहोत. रिकव्हरी पेशंटसाठी हॉटेलमध्ये व्यवस्था केली जाईल. तसंच नेस्कोमध्ये अतिरिक्त १५०० बेड्स वाढवणार असल्याची माहिती यावेळी महापौरांनी दिली. शासन नियमांचं उल्लंघन करू नका, असं आवाहनही महापौर पेडणेकर यांनी केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत डॉक्टरांचे आज काम बंद आंदोलन

“ठाकरे सरकारकडून कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या आकडेवारीची लपवाछपवी”