in

मयुर शेळकेचे पुन्हा एकदा माणुसकीचं दर्शन

वांगणी रेल्वे स्थानकात रुळावर पडलेल्या चिमुकल्याचा जीव वाचवणाऱ्या मयुर शेळकेने पुन्हा एकदा माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. मयुरने त्याला मिळणाऱ्या बक्षिसातील अर्धी रक्कम अंध माता संगीता शिरसाट यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच रेल्वेकडून मिळालेल्या 50 हजारांपैकी 25 हजार रुपये मयुर शिरसाट कुटुंबाला देणार आहे. आधी शौर्य गाजवून मनं जिंकणारा मयुर आपल्या ठायी असलेल्या दातृत्व गुणाचंही दर्शन घडवत आहे.

संगीता शिरसाट या वांगणीच्या एका चाळीत भाड्याच्या खोलीत मुलासह राहतात. रेल्वेत छोट्यामोठ्या वस्तू विकून त्या आपला उदरनिर्वाह करतात. मुलगा साहिल हाच त्यांचा एकमेव आधार असून त्याला वाचवणारा मयुर हा या अंध मातेसाठी खऱ्या अर्थानं देवदूत ठरला आहे. आपल्या लेकराला वाचवणाऱ्या रिअल हिरोचा यथोचित सन्मान करा, अशी निरपेक्ष मागणी या अंध माऊलीने केली होती. निष्पाप ओठांतून निघालेली ही इच्छा देवाने ऐकलीच, मात्र त्यातील अर्धी रक्कमही आपसूक तिच्या पदरी पडली. तर देवदूताच्या रुपाने धावलेल्या मयुरने बक्षिसाची अर्धी रक्कम देण्याची घोषणा करुन आपल्या व्यक्तीमत्त्वाच्या आणखी एका कंगोऱ्याचं दर्शन घडवलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही केंद्राच्या पाया पडायलाही तयार’

नाशिकसारखी मोठी दुर्घटना टळली; वेळीच ऑक्सिजन मिळाल्याने १०० रुग्णांचा जीव वाचला