in

धक्कादायक | कोरोनामुक्‍त मनोरूग्‍णाला ठेवले स्‍वच्‍छतागृहात

कोरोनामुक्‍त झालेल्‍या मनोरूग्‍णाला चक्‍क स्‍वच्‍छतागृहात ठेवण्‍यात आल्‍याचा धक्‍कादायक प्रकार समोर आलाय. अलिबागच्या जिजामाता हॉस्‍पीटलच्‍या कोविड सेंटरमधील हा प्रकार आहे. रूग्‍णाचा स्‍वच्‍छता गृहातील व्हिडिओ समोर आलाय. स्‍वच्‍छतागृहातील अस्‍वच्‍छतादेखील या व्हिडिओत स्‍पष्‍ट दिसत आहे. रूग्‍णालयातील कर्मचाऱ्यांनी या रूग्‍णाकडे दुर्लक्ष केलंय. काही दिवसांपूर्वी कोरोना उपचारासाठी त्‍याला रूग्‍णालयात आणले होते. इथं उपचार झाल्‍यानंतर गेले दोन दिवस हा मनोरूग्‍ण तिथंच पडून होता. आज या रूग्‍णालयात सेवा देणाऱ्याया सामाजिक कार्यकर्त्‍यांनी त्‍याला उचलून एका बेडवर ठेवलं. या रूग्‍णाला आता अनाथाश्रमात पाठवण्‍यासाठी प्रयत्‍न सुरू असल्‍याचं सांगण्यात आलंय.

जिल्‍हा शल्‍यचिकीत्‍सक डॉ. सुहास माने यांनीही या प्रकाराला दुजोरा दिलाय . मात्र या मनोरूग्‍णाचा इतर रूग्‍णांना त्रास होत होता, त्‍याचे नातेवाईकदेखील इकडे फिरकले नसल्‍याचे त्‍यांनी सांगितले . या रूग्‍णाला आता एखाद्या अनाथाश्रमात पाठवण्‍यासाठी प्रयत्‍न सुरू असल्‍याचेही डॉ. माने यांनी सांगितले .

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रशियाने विकसित केलेली ‘स्पुटनिक व्ही’ लस लवकरच भारतात दाखल होणार

थकीत वेतनासाठी महिलांचे आंदोलन… अमित देशमुख, विजय वडेट्टीवारांचा काढता पाय