in

लॉकडाऊनसंदर्भात आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज होणारी वाढ पाहता राज्यात लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सतत वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनसंदर्भात मोठा निर्णय घेऊ शकतात. सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात ही बैठक होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत म्हणाले होते की, आता निर्णय घेण्याची वेळ आहे. राज्यात लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. दरम्यान राज्य सरकारने गेल्या आठवड्यात कडक निर्बंध जाहीर केले होते. ज्यात वीकेंड लॉकडाऊन, रात्रीचा कर्फ्यू आणि दिवसा जमावबंदी यांसारख्या आदेशांचा समावेश होता. पुढील आदेश येईपर्यंत हे निर्बंध 30 एप्रिलपर्यंत सुरू राहतील.

दरम्यान लॉकडाऊनचा निर्णय 14 एप्रिलनंतरच्या कॅबिनेटमध्ये होणार असल्याची माहिती टास्क फोर्सच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्रीच करतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टास्क फोर्सच्या ऑनलाईन बैठकीत लॉकडाऊन लागू करण्यासह विविध विषयांवर चर्चा झाली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रुग्णाला बेड मिळाला नाही, म्हणून शेजारच्या रुग्णाला जमिनीवर आपटले; जागीच मृत्यू

Coronavirus | सेन्सेक्स- निफ्टीमध्ये मोठी घसरण