in

म्हाडा आता विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधणार, जितेंद्र आव्हाडांची घोषणा

कॅन्सरच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था केल्यानंतर आता म्हाडा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधणार आहे. म्हाडा आता विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधणार आहे. मुंबई शहरामध्ये 4 ठिकाणी असे वसतिगृह बांधण्यात येतील. त्याच्यातील पहिल्या वसतिगृहाची सुरुवात काळाचौकी, जिजामाता नगर येथे करण्यात येईल” अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून दिली आहे.

“सरकारच्या असे निदर्शनास आले आहे की, मुंबई, ठाण्यामधील म्हाडा कॉलनीमध्ये एक-एका इमारतीचा विकास करण्यासाठी म्हणून विकासकाने तिथल्या रहिवाशांबरोबर समझोता करार केला आहे. पण अनेक वर्षे या इमारतींचा विकास न-करता तसेच रहिवाशांना भाडे न-देता मुजोरपणाची वागणूक हे विकासक करीत आहेत. यापुढे 5 वर्षांपेक्षा अधिक जर विकासकाने इमारतीचे काम रोखून ठेवले. तर म्हाडाला ती इमारत स्वत: डेव्हलप करेल आणि विकासकाचा करार रद्द समजण्यात येईल” असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शिवसेनेचा एम आय एम आणि खासदार इम्तियाज जलील यांना टोला

मुख्यमंत्री साधणार जनतेशी संवाद… मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्यात लॉकडाऊनची शक्यता