in ,

राज्यातील पूरग्रस्तांना MIDC कडून मदत.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या पुढाकाराने २५ हजार कुटुंबियांना एमआयडीसी च्या वतीने भरीव मदत केली जाणार आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसामुळे काही ठिकाणी भयान परिस्थिती निर्माण झाली. महापुरामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले. संसार उध्वस्त झाले. आपत्तीग्रस्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मदत पोहचवण्यासाठी प्रयत्न करतोय. आता २५ हजार कुटुंबियांना महाराष्ट्र औदोगिक विकास महामंडळाच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंची मदत रवाना केली आहे.यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पुढाकार घेतलाय.

महापुराच्या फटक्याने कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्टातील पूरग्रस्तांना एमआयडीसीद्वारे अन्न्धान्यांचे वाटप केले.यामध्ये राशन,चादरी,बेडशीट,टॉवेल आणि काही अन्नपदार्थ वाटप केले आहे.याशिवाय ट्रकद्वारे पिण्याचे शुद्ध पाणीही पुरविण्यात आले ही मदत पूरग्रस्त भागांकडे पाठविण्यात आली आहे. ठाणे, डोंबिवली, पुणे, औरंगाबाद, नाशिक आदी प्रादेशिक कार्यालयांकडून ही मदत देण्यात आली. ठाणे, डोंबिवली एमआयडीसीकडून १००० राशनचे पाकिटे( २५ हजार किलो), २००० पाण्याच्या बाटल्या, ५५०० बँकेट्स, ५५०० टॉवेल्स पाठविण्यात आले तर औरंगाबादमधून ५०० अन्नधान्यांची पाकिटे पाठविण्यात आली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नॊकरीचे आमिष दाखवून बलात्कार; बोगस पत्रकारा विरोधात गुन्हा दाखल

Ahmednagar Lockdown | अहमदनगरमधील २० गावात दहा दिवस लॉकडाऊन