in

ONGC कामगारांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी

‘तोक्ते चक्रीवादळ समुद्र किनारपट्टीवर जोरदार धडकणार असल्याचे संबधित यंत्रणेने सांगितलेले असताना देखील ओएनजीसीने सर्व सूचनांकडे का दुर्लक्ष केले? सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन का केले नाही?’ असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी केला. कामगारांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

तौत्के चक्रीवादळाबद्दल सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा इशाराही देण्यात आला होता. स्थानिक सरकारी एजन्सींनी किनारपट्टीवरील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची व्यवस्था केली होती आणि मच्छीमारांना समुद्रात जाऊ नका, असंही सांगण्यात आलं होतं. मग ONGC ने सर्व चेतावणींकडे दुर्लक्ष का केलं आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन का केले नाही? चक्रीवादळ सुरू होण्यापूर्वी त्यांनी सर्व कामगारांना बार्जमधून बाहेर का काढले नाही आणि किनार्‍यावर आणले नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.

दरम्यान ONGC मुळेच 60 निरपराध कामगारांचे जीव धोक्यात आले. या दुर्लक्षामुळे 60 लोक अजूनही बेपत्ता आहेत आणि बर्‍याच जणांनी आपला जीव गमावला, असा गंभीर आरोप मलिकांनी केलाय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोनामुळे आशिया कप 2021 स्पर्धेचं आयोजन रद्द

SSC Board Exam | दहावीच्या परीक्षेबाबत आज निर्णय?