in

‘शाळांची मस्ती वाढलीय’, राज्यमंत्री बच्चू कडूंनी केल्या मान्यता रद्द करण्याचा सूचना

सूरज दहाट, अमरावती | अमरावती शहरात फी न भरल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांला कमी मार्क दिल्याची घटना घडली आहे. शाळेच्या या कारभाराविरोधात आज विद्यार्थ्यांने थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. त्यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला भेट देत शाळेची मान्यता रद्द करण्याचा सूचना केल्या.

महर्षी पब्लिक स्कूलने फी न भरल्याने अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथील पंकज राजेंद्र बारद्धे या दहावीच्या विद्यार्थीला कमी मार्क दिले.त्यामुळे आज विद्यार्थ्यांने थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.

अचानकपणे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला भेट देत खंत व्यक्त केली. बच्चू कडू यांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली तर सदर शाळेवर फौजदारी कारवाई करून शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवावा अशा सूचना शिक्षणाधिकारी,व जिल्हापरिषद मुख्याधिकारी यांना दिल्या आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सांगलीकरांना वीज वितरण कंपनीचा झटका; हाय व्होलटेजमुळे शेकडो विद्युत उपकरणे जळून खाक

Lakhimpur Violence | आरोपी आशिष मिश्राला तीन दिवसांची कोठडी