in

इन्स्टाग्रामवर बनला मित्र… नंतर घरात घुसून तरुणीवर अतिप्रसंग

सोशल मीडियाच्या माध्यमातून एका मुलीवर अतिप्रसंग झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपी अल्पवयीन मुलाने या अल्पवयीन पीडितेवर तिच्या घरात घुसून शारीरिक अत्याचार केला आहे.

सध्या सोशल मीडियाचा फिव्हर तरुणांमध्ये मोठा आहे. अल्पवयीन मुलांच्या हाती देखील स्मार्टफोन्स असल्याने त्यांचा सोशल मीडियावरचा वावर वाढल्याचं दिसतंय. मात्र, हीच सोशल माध्यमे अनेकदा गुन्हेगारी आणि महिला अत्याचारांच्या घटनांना कारणीभूत ठरताना दिसत आहे. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. इन्स्टाग्राम ओळख झाल्यानंतर एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अल्पवयीन तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल माध्यमांचा वाईट अनुभव देणारी घटना पुण्यच्या कात्रजमध्ये समोर आली. सुखसागर भागात राहणार्‍या एका युवकाने अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केला आहे.

पीडित तरुणी आणि आरोपी या दोघांची ओळख इन्स्टाग्राम या सोशल माध्यमावर झाली. त्यानंतर ते दोघे सतत एकमेकांना बोलत असायचे. संवादातून आरोपीने अल्पवयीन तरुणीचा विश्वास संपादन केला. मंगळवारी (१३ एप्रिल) दुपारी तरुणीच्या घरात कोणी नसल्याचे पाहून आरोपीने घरात घुसला. तरुणी एकटीच असल्याचे पाहून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर आरोपी पसार झाला.

पीडित तरुणीची आई घरी आल्यावर तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेतला असल्याचे बिबवेवाडी पोलिसांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Dr.Babasaheb Ambedkar | नखापेक्षा लहान पोर्ट्रेट; महामानवाला अनोखे अभिवादन

#BreakTheChain | हीच ती वेळ… महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू