in

“टू-व्हीलर चालवण्यापेक्षा नगरपालिका व्यवस्थित चालवा”

प्रशांत जगताप | सातारा : शहरात टू-व्हीलर चालवण्यापेक्षा सातारची नगरपालिका व्यवस्थित चालवायला हवी होती, असे टीकास्त्र आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजेंवर सोडले आहे.

सातारा शहरात खासदार उदयनराजे यांनी विकासाची कामे केली म्हणून टुव्हीलर चालवत त्यांनी रॅली काढली. त्यापेक्षा नगरपालिका व्यवस्थित चालवली असती तर आज पोस्टरबाजी करायची गरज नसती. या पोस्टरबाजीचा खर्च नगरपालिकेच्या तिजोरीतून झाला असेल तर, या पैशानी एक चांगला रस्ता किंवा गटर यांचे सूशोभीकरण झाले असते. तसेच उदयनराजे यांनी टुव्हीलर व्यवस्थित चालवली तशीच सातारची नगरपालिका देखील पाच वर्ष व्यवस्थित चालवायला हवी होती.

सातारा शहरात आज जी विकास कामे दाखवली जात आहेत, ती फक्त नौटंकी आहे. नगरपालिका निवडणूका जवळआल्या म्हणून आपल्याला सत्ता कशी मिळेल? अशी टीका आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईकरांसाठी १० नव्या मोनोरेल येणार!

पुणे हादरले! अल्पवयीन मुलीचा तीन नराधमांनी कोयत्याने गळा चिरून केली हत्या