in

सेनेच्या कार्यक्रमात निर्बंध कुठे जातात?; शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून मनसे आक्रमक

शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा शिवाजी पार्कात न होता तो षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी ५० टक्के उपस्थिती असणार आहे. या मेळाव्यासाठी शिवसेनेचे नेते, उपनेते, मंत्री, आमदार, महापौर आणि नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. मात्र, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. याबाबत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करत सेनेच्या कार्यक्रमात निर्बंध कुठे जातात? असा सवाल उपस्थित केला आहे.

षण्मुखानंद सभागृहात दसरा मेळावा साजरा करताना सरकारचे निर्बंध कुठे लपून बसतात? शिवसैनिक ५० टक्के आसनक्षमतेने गर्दी करतील, यावर आम्ही विश्वास ठेवायचा? दसरा मेळाव्याची परंपरा खंडित झालेली यांना चालत नाही, नाटकाची परंपरा इतके दिवस खंडित झाल्याचं यांना सोयरसुतकही नाही? इतकंच होतं तर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नाट्यगृहं का खुली केली नाहीत? नाट्यकर्मी आणि प्रेक्षक यांचा मेळावा राजकीय अजेंड्यापेक्षा मोठा आहे हे यांना लक्षातच येत नाही का?

असे मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करत सेनेच्या कार्यक्रमात निर्बंध कुठे जातात? असा सवाल उपस्थित केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘हम दो हमारे दो’ चा मजेशीर ट्रेलर रिलीज

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड