नाशिकच्या कामटवाडे येथील मनसे नेते नंदलाल आबा शिंदे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समोर आले नाही आहे. मात्र या घटनेने शोक व्यक्त होत आहे.
मनसे नेते नंदलाल आबा शिंदे यांनी आपल्या स्कोडा रॅपिड कारमध्ये स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. सटाणा-साक्री रस्त्यावर हि घटना घडली. सामोडा ( ता.साक्री ) येथील मूळचे ते रहिवासी असून नाशिकच्या महिंद्रा अँड महिंद्रा मधील युनियनचे ते माजी पदाधिकारी असल्याचे समजते.
शिंदे हे त्यांच्या स्कोडा रॅपिड कारमधून नाशिककडे निघालेले असतांना त्यांच्या मावस भावाशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांनी माझी गाडी चालविण्याची मनःस्थिती नसून मी सटाण्याजवळ उभा असल्याचे सांगितले होते.त्यानंतर शिंदे यांचे नातेवाईक तेथे पोहोचले असता नंदलाल शिंदे हे आपल्या स्कोडा कारमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले.

दरम्यान, स्वतःच्या रिव्हॉल्वरमधून गोळी झाडत त्यांनी आत्महत्या केल्याची प्रथमदर्शनी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच आत्महत्ये मागचे करारन अद्याप समजू शकले नाही आहे. या प्रकरणी पुढील तपास सटाणा पोलीस करीत आहेत.
Comments
Loading…