in

‘प्रियंका अन् कंगनाला भेटणाऱ्या मोदींकडे संभाजीराजेंना भेटण्यासाठी वेळ नाही’

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना मराठा आरक्षणाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या अलिप्त भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली होती. नरेंद्र मोदींना मी चार वेळा पत्रव्यवहार केला, पण अद्यापही मला भेट मिळाली नाही, असे संभाजीराजेंनी जाहीरपणे सांगितले होते. त्यानंतर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन, काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही मोदींच्या या भूमिकेवरुन प्रश्न विचारला आहे.

चंद्रकांत दादा, प्रियांका चोप्रा व कंगनाला वेळ देणाऱ्या मोदींना छत्रपती संभाजी राजेंना भेटायला वेळ नाही. राजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भेटू पाहत होते. या अभिनेत्री‌ कोणते प्रश्न घेऊन भेटल्या? कोणास भेटावे हा आक्षेप नाही. संभाजीराजेंना भेट न देणे हा महाराष्ट्राचा अवमान आहे,” असे ट्विट सचिन सावंत यांनी केलं आहे. सावंत यांनी कंगनासोबत भेटीचा फोटोही ट्विटरवरुन शेअर केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

१०० कोटी वसुली प्रकरण : मुंबईतील पाच बार मालकांना ईडीचं समन्स

PNB घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्सी 3 दिवसांपासून बेपत्ता