in

Monsoon Alert | पुढचे 5 ते 6 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, IMDचा अंदाज

राज्यात पावसाची मुसळधार सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच पुढचे 5 ते 6 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या वतीनं हवामानाचा सुधारित अंदाज जारी करण्यात आला आहे. सुधारित अंदाजानुसार राज्यात पुढील पाच ते सहा दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रविवारी राज्यातील अनेक भागात मान्सूनच्या पावसानं हजेरी लावली आहे. रविवारी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पाऊस झाला. मराठवाड्यातील काही ठिकाणी देखील जोरदार पाऊस झाला. त्यानंतर आता भारतीय हवामान विभागानं पुढील पाच ते सहा दिवस राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याचा इशारा दिला आहे.

मान्सूनचा पाऊस येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये रौद्र रुप धारण करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, गोवा, घाटमाथ्याचा प्रदेश. मध्य महाराष्ट्राला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागानं दिला आहे. पुढील 5 ते 6 दिवसांमध्ये या भागात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वसईत जलभरावाला महापालिका जबाबदार; 70 वर्षीय आजोबाचा साचलेल्या पाण्यात ठिय्या

चित्रकार अक्षय मेस्त्रींनी 16 विटांवर साकारली विठ्ठलाची मनमोहक कलाकृती