in

Monsoon 2021 | महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई वेधशाळेने पुढील तीन तासात नांदेड, परभणी जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाऊस आणि वीज कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. परभणी जिल्ह्यात सकाळपासून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. गडचिरोलीमध्येही पहाटेच्या सुमारास पाऊस झाला.

परभणी जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील काही भागात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. परभणी शहरासह ग्रामीण भागात विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला.

गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान अर्ध्या तासाचा पाऊस झाला. या एका आठवड्यात तीनदा पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या कामात मोठी मदत झालेली आहे. तापमान कमी झाल्यामुळे शेतकरी शेतीच्या कामाला लागलेले आहेत. पुढच्या आठवड्यात ही गडचिरोलीत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Gold-Silver Price | दोन दिवसांत सोन्याचा भाव हजार रुपयांनी घसरला

वसई-विरारकरांना दिलासा; मोबाइल व्हॅन लसीकरणाने घेतली गती