in

Monsoon Update | अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापुरात पावसाची संततधार

मुंबई आणि कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यानंतर आज सकाळपासूनच ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून या तीनही शहरांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे.

आजपासून ४ दिवस मुंबई उपनगर आणि कोकण किनारपट्टी भागाला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या इशाऱ्यानुसार आज सकाळपासूनच उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरांमध्ये अखंडपणे पाऊस सुरू आहे. मात्र असं असलं तरी, अद्याप तरी कुठेही पाणी साचल्याचा प्रकार समोर आलेला नसून कुठेही अद्याप कुठलीही दुर्घटना घडलेली नाही. अतिवृष्टीचा इशारा असल्यानं प्रशासन सज्ज असून आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्वांनाच तयारीत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दूषित पाण्यामुळे अनेकांनी गाठले दवाखाने

पहिल्याच पावसात मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प