in

Monsoon Update | आजही मुंबई, कोकणाला अतिवृष्टीचा इशारा

महाराष्ट्रात अनेक भागात मुसळधार पावसामुळे शनिवारी आणि रविवार हा मुंबईसाठी काळरात्र ठरला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी दरड, भिंत कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या. यामध्ये तब्बल ३० निष्पाप जीव दगावले. पण आज पुन्हा एकदा मुंबईसह कोकणाला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात मुसळधारेची शक्यता वर्तवली आहे. सावधगिरी बाळगण्याच्या प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत.

पुढच्या २४ ते ३६ तासांसाठी रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर १९ ते २२ जुलै या कालावधीसाठी मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांना ऑरेंज अर्लट जारी करण्यात आला आहे.

कोणत्या जिल्ह्यात मध्यम आणि मुसळधार पाऊस?
पुढच्या ३ ते ४ तासांत सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सातारा, सांगली, नांदेड, बीड, जालना, औरंगाबाद, नाशिक, धुळे जळगाव आणि परभणीत मध्य स्वरुपाच्या मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘खुलेआमपणे फोन टॅपिंग; पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी खुलासा करावा’

पंढरपूरची वारी सर्वोच्च न्यायालयात; ठाकरे सरकारच्या निर्णयाला आव्हान