in

Monsoon Update | कोकण रेल्वेच्या मार्गावर दरड कोसळली, वाहतूक ठप्प

गोवा करमळी येथील बोगद्यात माती कोसळत असल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघड झाला.ही वाहतूक पूर्ववत करण्यासाठी दहा तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईतील दादर, परळ परिसरात काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सोबतच दक्षिण मुंबईतही पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. पुढील काही तासात मुंबई जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असं आयएमडी मुंबईने काल रात्री साडे बारा वाजता जाहीर केलं होतं. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागांत पाणी साचण्यात सुरुवात झाली आहे.

रेल्वे सेवेवरही पावसामुळे परिणाम झाला असून सीएसटीएमवरुन जाणाऱ्या अनेक मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर कल्याण ते मुंबई दरम्यान जाणाऱ्या ट्रेन बंद आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशी एक तास प्रतीक्षा करुन परत घरी जात आहेत. बाहेरून येणाऱ्या एक्सप्रेस गाड्या कल्याण स्टेशनवर थांबवण्यात आल्या आहेत.

पुणे-मुंबईदरम्यान ‘या’ चार रेल्वे रद्द

शनिवारी मध्यरात्रीनंतर मुंबईत झालेल्या पावसामुळे मुंबईतील रेल्वे सेवा काही तासांसाठी विस्कळीत झाली होती. विविध रेल्वेमार्गांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने अनेक रेल्वेच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. ऐनवेळी गाड्या रद्द झाल्याने तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांना रेल्वे स्थानकातून माघारी फिरावे लागले.

पुणे रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या डेक्‍कन क्वीन, डेक्‍कन एक्‍स्प्रेस, इंद्रायणी एक्‍स्प्रेस या गाड्यांच्या दोन्ही बाजूंच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. मुंबईहून कोल्हापूरला जाणारी कोयना एक्‍स्प्रेस रद्द केली होती. यासह सोलापूर-मुंबई सिद्धेश्‍वर एक्‍स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्‍स्प्रेस, बिदर-मुंबई एक्‍स्प्रेस, पंढरपूर-दादर एक्‍स्प्रेस, हुबळी-मुंबई एक्‍स्प्रेस आदी गाड्या पुणे स्थानकापर्यंतच धावल्या. काही लांब पल्ल्यांच्या रेल्वेतील प्रवाशांना दोन ट्रेन बदलत मुंबई गाठावी लागली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सुरक्षा दलाला मोठं यश; लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर चकमकीत ठार

Mumbai Rains | ठाणे-सीएसएमटी वाहतूक विस्कळीत, तर रस्ते वाहतूक धीम्या गतीनं