in

विकास दर १२ टक्के ; ‘मूडीज’चा अहवाल जारी

चालू वर्ष 2021मध्ये भारतीय अर्थव्यवस्था १२ टक्के वेगाने प्रवास करेल, असा विश्वास मूडीज या अमेरिकी वित्तसंस्थेच्या विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. पूरक पतधोरण आणि वित्तीय धोरणं देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेसाठी निमित्त ठरणार आहे. रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट ४ टक्क्यांखाली येणार नाही, असा दावाही करण्यात आला.

जुलै सप्टेंबर 2020 या तीन महिन्यातील उणे 7.5 टक्क्यांच्या तुलनेत ऑक्टोबर ते डिसेंबर 2020मध्ये भारताचा विकास दर सकारात्मक 0.4 टक्के राहिल्याकडे मूडीजनं लक्ष वेधलं आहे. प्राप्तिकरातील कपातीसारख्या सरकारच्या प्रत्यक्ष आर्थिक सुधारणांचा अर्थव्यवस्थेला फारसा हातभार लागणार नाही, अशीही शंका व्यक्त करण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Rains | राज्यातील ‘या’ भागात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता

फास्टॅग नसलेली वाहनं बेकायदेशीर ठरवायची का; न्यायालयाचा केंद्राला सवाल