in

प्रेमात अडथळा ठरणाऱ्या चिमुकल्याचा आईनेच काढला काटा

प्रियकरासाठी आईनेच पोटच्या मुलाचा हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. जालना जिल्ह्यातल्या अंबडमधील ही घटना आहे. अनैतिक सबंध टिकून राहावेत म्हणून आईने हे कृत्य केल्याचे समोर येत आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे.

नक्की काय आहे प्रकरण :
शितल विनोद उघडे असं या आरोपी महिलेचं नाव असून तिचे पैठन तालुक्यातील नवनाथ शामराव जगधने याच्याशी अनैतिक संबंध होते. दोन दिवसांपर्वी शितल आपला सहा वर्षांचा मुलगा आदित्यला घेवून भावासह अंबड येथील सरकारी रुग्णालयात आले. मात्र तिथे मुलगा कुणी तरी पळवून नेल्याची तक्रार आई शितल हिने अंबड पोलिसात दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास करत अवघ्या नऊ तासात दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असता त्यांतील आरोपी नवनाथ शामराव जगधने याने फिर्यादी शितल सोबत अनैतिक संबंध असल्याची कबुली दिली. आणि मुलगा प्रेमात अडसर ठरत असल्यानं दोघांनी कट रचून त्याचा खून केला असल्याची कबुली आरोपींनी दिलीये.दरम्यान घटनास्थळावर जाऊन पोलिसांनी आदित्यची बॉडी ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सुरेखा पुणेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

”केंद्रानं केंद्राचं काम करावं,राज्यांच्या अधिकारांवर गदा आणू नये”