in ,

Jagdish Lad | मि. इंडिया बॉडीबिल्डर जगदीश लाडचं कोरोनाने निधन

मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड याचे कोरोनामुळे निधन झाले आहे. जगदीश केवळ 34 वर्षांचा होता. बॉडी बिल्डिंगमधील मानाचा मि. इंडिया हा किताब त्याने पटकावला होता. जगदीशच्या जाण्याने लाड कुटुंबावर आणि बॉडीबिल्डिंग विश्वावर शोककळा पसरली आहे.

जगदीश लाडला काही दिवसापूर्वी कोरोना झाला होता. त्याच्यावर गुजरातमधील बडोदा इथं उपचार सुरु होते. मात्र उपचारा दरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला. जगदीश लाड हा नवी मुंबईत राहात होता. त्याने मागील वर्षीच गुजरातमधील बडोदा इथं जीम सुरु केली होती. त्यामुळे तो तिकडेच असायचा. जगदीशला लहानपणापासूनच बॉडी बिल्डिंगचं आकर्षण होतं. त्यामुळे पिळदार शरीरयष्टीच्या जगदीशने महाराष्ट्रातील अनेक स्पर्धा गाजवल्या. त्याने नवी मुंबई महापौर श्रीसह मोठ मोठ्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदकं पटकावली होती.

जगदीशच्या आयुष्यातील सर्वात मोठं यश म्हणजे त्याने मिस्टर इंडिया या मानाच्या स्पर्धेत दोनवेळा सुवर्णपदकं पटकावली होती. इतकंच नाही तर मुंबईतील वर्ल्ड चॅम्पियन्सशिपमध्ये त्याला कांस्य पदक मिळालं होतं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ऑक्सिजन पुरवठ्यावरून सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सुनावलं!

कर्जत ते मुंबई रेल्वेसेवा दीड तासांपासून विस्कळीत