in

दिवाळीच्या सुट्टीत राज्यभरात दररोज 1000 जादा गाड्या

आगामी दिवाळीचा सण तसेच येणाऱ्या सलग सुट्ट्यांमध्ये पर्यटनाला आणि गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांच्या भेटीसाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातील आगारातून दररोज सुमारे 1 हजार जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. 29 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर 2021 या कालावधीत या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. या जादा गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध होणार आहेत. प्रवाशांनी या जादा गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी केले आहे.

राज्यभरातील आगारातून दररोज 1000 जादा गाड्या

● दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशी महाराष्ट्रातील अनेक पर्यटन स्थळांना भेट देतात. तर अनेक जण आपापल्या गावी जातात. किफायतशीर दर आणि सुरक्षित प्रवास म्हणून प्रवासी दरवर्षी एसटीतून प्रवासाला प्राधान्य देतात.


● गेल्यावर्षी राज्यावर असलेले कोरोनाचे संकट पाहता प्रवाशांनी पर्यटनाकडे पाठ फिरवली होती. यंदा महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी नियमित गाड्या व्यतिरिक्त राज्यभरातील आगारातून दररोज 1000 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवले

108MP कॅमेरा आणि मजबूत चिपसेटसह हा स्मार्टफोन लवकरच होणार लाँच