in

Mucormycosis | आता ब्लॅक फंगसच्या उपचारासाठीचे इंजेक्शन ‘या’ किंमतीत मिळणार

ब्लॅक फंगस इन्फेक्शनच्या उपचारासाठी वर्धामध्ये जेनेटेक लाईफ सायन्सेसने Amphotericin B Emulsion इंजेक्शनचे उत्पादन सुरू केले आहे. सोमवारपासून या इंजेक्शनचे वितरण सुरू होईल, ज्याची किंमत 1200 रुपये असेल. सध्या हे इंजेक्शन 7000 रुपयांपर्यंत मिळत आहे. या संपूर्ण प्रोजेक्टमध्ये केंद्रीय मंत्री नितिन गडकरी मदत करत होते. यापूर्वी रेमडेसिवीर इंजेक्शनचे सुद्ध उत्पादन सुरू केले आहे.

गडकरी यांच्या ऑफिसने आपल्या ट्विटरवर याची माहिती देताना म्हटले की, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या प्रयत्नातून कोविडनंतर वेगाने पसरत असलेल्या ब्लॅक फंगस इन्फेक्शनच्या उपचारासाठी वर्धामध्ये जेनेटेक लाईफ सायन्सेसने अ‍ॅम्फोटेरेसीन बी इल्युलशन इंजेक्शन तयार केले आहे. आतापर्यंत भारतात एकच कंपनी याचे उत्पादन करत होती. सोमवारपासून या इंजेक्शनचे वितरण सुरू होईल आणि याची किंमत 1200 रुपये असेल. सध्या हे इंजेक्शन 7000 रुपयांपर्यंत मिळत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maratha Reservation : संभाजीराजेंची राजकीय खलबतं… शरद पवार व राज ठाकरेंची घेतली भेट

Lockdown | लॉकडाउन पुन्हा वाढणार पण…