in

Mucormycosis : म्युकरमायकोसिस आजाराचा साथरोग कायद्यात समावेश, केंद्र सरकारनं जारी केली नवी नियमावली

कोरोना माहामारीनंतर देशात म्युकरमायकोसिस धोका वाढत चालला आहे. हा धोका लक्षात घेता आता केद्र सरकारने म्युकरमायकोसिस र्थात काळी बुरशी या आजाराचा साथरोग कायद्यात समावेश केला आहे. तसेच या आजारासंबधित नवीन नियमावली लागू केली आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता रुग्णांची तपासणी, उपचार आणि या आजाराच्या व्यवस्थापनासाठी साथरोग नियंत्रण कायद्यातील नियमावलीचा वापर करणं आवश्यक ठरणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने राज्य सरकारांना देखील आवाहन केलं असून त्यांनी देखील राज्य पातळीवर म्युकरमायकोसिसला साथीचा आजार म्हणून जाहीर करावं, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यांना सुचना

यासंदर्भात आरोग्य विभागाचे सहाय्यक सचिव लव अगरवाल यांनी सर्व राज्यांना लिखित स्वरूपात सूचना दिल्या असून साथरोग कायद्यांतर्गत म्युकरमायकोसिसचं व्यवस्थापन केलं जावं असं सांगितलं आहे. “तुम्हा सर्वांना विनंती आहे की म्युकरमायकोसिसचा समावेश साथरोग कायदा १८९७ अंतर्गत करण्यात यावा. यामध्ये सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालये, आरोग्य सेवा केंद्र, वैद्यकीय महाविद्यालये यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करतील. यामध्ये रुग्णाची तपासणी, आजाराचं निदान आणि उपचार व्यवस्थापन यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालय, आयसीएमआर यांनी दिलेल्या सूचनांचं देखील पालन होईल. याशिवाय, म्युकरमायकोसिसचे संशयित आणि बाधित अशा रुग्णांची आकडेवारी आरोग्यविभागाला जिल्हानिहाय पुरवली जावी. यामध्ये जिल्ह्यातील मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि संबंधित यंत्रणेचा समावेश असेल”, असं आरोग्यमंत्रालयाने जारी केलेल्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शरजील उस्मानीचं ट्विट; जालन्यात गुन्हा दाखल

नेमबाज, प्रशिक्षक मोनाली गोऱ्हेंचे कोरोनाने निधन