in

मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादला; ताबा घेताच अदानींचा निर्णय

मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात येताच अदानी यांनी कंपनीचे मुख्यालय अहमदाबादला हलवले आहे. मुंबईचे हे विमानतळ आता पूर्णपणे ‘अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड’च्या (एएएचएल) ताब्यात गेले आहे. त्याबरोबर एएएचएलचे मुख्यालय मुंबईतून हलविण्यात आले आहे. संकटात आलेल्या जीव्हीकेकडून अदानी समूहाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचा (मिआल) ताबा स्वत:कडे घेतला आहे.

अदानी उद्योग समूहाकडे मुंबईसह देशातील प्रमुख सहा विमानतळांचा ताबा आहे. त्यामध्ये लखनऊ, जयपूर, गुवाहाटी, अहमदाबाद, तिरुवनंतपुरम आणि मंगळुरु या विमानतळांचा समावेश आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पंतप्रधान मोदी यांचं मराठीमध्ये ट्विट

Porn apps Case | राज कुंद्रासह नेरूळमधून आणखी एकाला अटक!